पार्टनरसमोर ‘परफॉर्मन्स’चं दडपण येतंय? उत्तेजना वाढवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींची होईल मदत

WhatsApp Group

आजच्या स्पर्धात्मक युगात कामाचा ताण आणि मानसिक थकवा याचा थेट परिणाम वैवाहिक आयुष्यावर होत आहे. अनेक पुरुष ‘परफॉर्मन्स अँक्झायटी’ (Performance Anxiety) मुळे त्रस्त आहेत. जोडीदारासमोर आपण कमी पडू की काय, ही भीतीच लैंगिक इच्छेत अडथळा निर्माण करते. जर तुम्हालाही अशा दडपणाचा सामना करावा लागत असेल, तर घाबरून न जाता काही नैसर्गिक आणि मानसिक उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते.

१. संवादातून दडपण हलके करा

परफॉर्मन्सच्या दडपणाचे मुख्य कारण म्हणजे जोडीदाराशी असलेल्या संवादाचा अभाव. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भीती किंवा तणावाबद्दल जोडीदाराशी मोकळेपणाने बोलता, तेव्हा निधे दडपण तिथेच कमी होते. जोडीदाराचा पाठिंबा आणि समजदारपणा तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे नैसर्गिक उत्तेजना मिळणे सोपे जाते.

२. ‘फोरप्ले’ला द्या प्राधान्य

अनेकदा थेट शारीरिक संबंधांकडे वळल्यामुळे ताण वाढतो. याऐवजी ‘फोरप्ले’वर अधिक लक्ष केंद्रित करा. एकमेकांचा स्पर्श, गप्पा आणि चुंबन यामुळे शरीरात ‘डोपामाइन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ सारखी संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके नैसर्गिकरीत्या ताण कमी करतात आणि शरीराला शारीरिक संबंधांसाठी सज्ज करतात.

३. नियमित व्यायामाची जोड

शारीरिक संबंधांसाठी शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) उत्तम असणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम केल्याने, विशेषतः कार्डिओ वर्कआउटमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि गुप्तांगांकडील रक्तप्रवाह वाढतो. पेल्विक स्नायूंसाठी ‘कीगेल व्यायाम’ केल्याने पुरुषांना त्यांच्या उत्तेजनेवर अधिक चांगले नियंत्रण मिळवता येते.

४. झोप आणि विश्रांती आहे महत्त्वाची

सततचा थकवा हा कामेच्छेचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुमचे शरीर थकलेले असेल, तर मेंदू लैंगिक उत्तेजनेला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते. पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभते आणि परफॉर्मन्सचे दडपण कमी होते.

५. आहारातून मिळवा नैसर्गिक शक्ती

तुमच्या आहारात डार्क चॉकलेट, केळी, अक्रोड आणि टरबूज यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ नैसर्गिकरीत्या रक्तवाहिन्या विस्तारण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. तसेच, अतिप्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान टाळा, कारण या सवयींमुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन उत्तेजनेच्या समस्या वाढू शकतात.