उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. बीकेसीमधील दसरा मेळाव्यात हा पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं. मात्र त्यांची नावं सांगण्यास त्यांनी नकार दिला. खासदार तुमाने यांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
बंडखोरीनंतर आतापर्यंत शिवसेनेमधील 40 आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता आणखी पाच आमदारही गेले तर ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दुसऱ्या बाजुला दोन खासदारांपैकी एक मुंबईतील तर एक मराठवाड्यातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तुमाने यांनी म्हटलं की, एक प्रभावी खासदार शिंदे गटात प्रवेश करू शकतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
