देशमुखांनंतर पवारांवर कारवाई, 1 हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आयकर विभागाने धडक कारवाई करत उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित असलेल्या मालमत्ता जप्तीचा आदेश दिला आहे. या मालमत्तांची किंमत तब्बल १ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागाने या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत

1. जरंडेश्वर साखर कारखाना
बाजार मूल्य- सुमारे 600 कोटी रुपये

2. दिल्लीत फ्लॅट
बाजार मूल्य-सुमारे 20 कोटी रुपये

3. पार्थ पवार यांचे निर्मल कार्यालय
बाजार मूल्य- सुमारे 25 कोटी रुपये

4. गोव्यात बांधलेले निलय रिसॉर्ट
बाजार मूल्य- सुमारे 250 कोटी रुपये

5. महाराष्ट्रातील विविध 27 ठिकाणांची जमीन
बाजार मूल्य- सुमारे 500 कोटी रुपये

अजित पवार हे अनेक दिवसांपासून आयटीच्या निशाण्यावर आहेत. गेल्या महिन्यात, आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट समूह आणि  पवार यांच्या नातेवाईकांच्या मालकिच्या जागेवर धाड टाकून 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली होती.

आयकर विभागाने 7 ऑक्टोबर रोजी 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यादरम्यान पार्थ पवार यांच्या अनंत मार्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरही आयकर विभागाने धाड टाकली होती. याशिवाय पवार बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली.


गेली अनेक दिवस ठोकरे सरकारमधील अनेक मोठे मत्री केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. आजवर महा विकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे दिग्गज आमदार प्रताप सरनाईक, भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ट नेते एकनाथ खडसे हे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत