धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू

WhatsApp Group

बिहार – एकीकडे बिहारमध्ये दारूबंदी कायदा प्रभावी करण्यासाठी नितीश सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बनावट आणि विषारी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याने बिहार सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नालंदा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांचा मृत्यू विषारी दारू पिल्यानेच झाला असल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशन हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली या भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बनावट दारू पिलेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवरही खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दारू प्यायल्यानंतर सर्वांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.


या परिसरातील आजूबाजूला दारू बनविण्याचे ठेके असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगवा गावातही दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 2021 मध्ये विषारी दारू पिल्याने शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दारूबंदी कायद्यामुळे वाढत्या केसेसवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. बिहारमधील मद्य तस्करीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती सीजेआय एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बिहार सरकारला खडसावले होते.

 

अधिक बातम्या वाचा 

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू