नागपुरात तलावात बुडून 5 मित्रांचा मृत्यू

WhatsApp Group

नागपूर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रविवारी तलावाकडे पार्टी करायला गेलेल्या 5 मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोहगाव झिल्पी  तलावात रविवारीचया दिवशी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऋषिकेश पार्ले (21), राहुल मेश्राम (23), वैभव भागेश्वर वैद्य (24), शंतनू आरमकर (23) आणि नितीन नारायण कुंबरे अशी या मृत मुलांची नावे आहेत.