मालाडमधील मार्वे बीचवर पोहायला गेलेल्या 5 मुलांचा बुडून मृत्यू, 3 जण बेपत्ता

0
WhatsApp Group

मुंबईतील मार्वे बीचवर (Marve Beach) आलेल्या 12 ते 15 वयोगटातील पाच मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाचपैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

मालवणी परिसरातील ही मुले मालाड मार्वे समुद्रकिनारी फिरायला गेली होती. या मुलांनी आंघोळीसाठी समुद्रात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाच मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात या मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. कृष्णा जितेंद्र हरिजन (वय 16 वर्षे) आणि अंकुश भरत शिवरे (वय 13 वर्षे) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले. तर शुभम जयस्वाल (12), निखील कायामुकूर (13) व अजय हरिजन (12) ही तीन मुलं बेपत्ता आहेत.