भारताने जगाला एकापेक्षा एक गोलंदाज दिले आहेत. चला, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या या पाच गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया. यापैकी 3 खेळाडू निवृत्त झाले आहेत.
अनिल कुंबळे हा भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 403 सामन्यात 956 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 367 सामन्यात 711 विकेट घेतल्या आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 270 सामन्यात 697 विकेट घेतल्या आहेत.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने टीम इंडियासाठी 356 मॅचमध्ये 687 विकेट घेतल्या आहेत.
झहीर खानने भारतासाठी 309 सामन्यात 610 विकेट घेतल्या आहेत.