महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे 5.4 लाख लाभार्थी

WhatsApp Group

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) लाभार्थ्यांची संख्या 5,49,385 आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना 1,252.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN), ही केंद्रीय क्षेत्र योजना आहे, ज्याचा उद्देश देशभरातील शेतीयोग्य भूधारक शेतकरी कुटुंबांना काही अपवादात्मक निकषांच्या अधीन राहून आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला 6000/- रुपये 2000/- रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये, लाभार्थ्यांच्या आधार निगडित बँक खात्यात थेट वर्ग केले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत जून 2023 पर्यंत एकूण 13 हप्ते जारी करण्यात आले आहेत.