
केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्यानुसार, वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना अग्निवीर संबोधण्यात येईल. त्यांना चार वर्षे लष्करात सेवा करता येणार आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून पुढील 7 महिन्यात 40 हजार जवानांची सैन्यात भरती होणार आहे. त्यासाठी, देशातील 773 जिल्ह्यात हे अभियान चालणार आहे. नौदल आणि वायू दलाने अनुक्रमे एका वर्षात 3 हजार आणि 3.5 हजार जवानांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरीकुमार म्हणाले की, या योजनेमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल. या योजनेची घोषणा तिन्ही दलांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. संपूर्ण देशात ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. तर, उपप्रमुख बीएस. राजू यांनी सांगितले की, 180 दिवसांत 25,000 जवानांची भरती होणार आहे. त्यानंतर, पुढील महिन्यात 15000 अग्निवीरांचा भरती होईल.
‘अग्निपथ’ योजनेची वैशिष्ट्ये?
४६,००० सैनिकांची यावर्षी तीनही दलात भरती
४४ लाख रुपये सेवेत असताना विकलांग झाल्यास देणार, याशिवाय शिल्लक नोकरीचे वेतनही दिले जाईल.
११.७१ लाख रुपये प्रत्येक अग्निवीराला मिळणार
२५% अग्निविरांना मेरिटच्या आधारावर नियमित कॅडरमध्ये समाविष्ट करणार
वेतन किती?
पहिले वर्ष – ₹३०,०००
दुसरे वर्ष – ₹३३,०००
तिसरे वर्ष – ₹३६,५००
चौथे वर्ष – ₹४०,०००