मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली

WhatsApp Group

अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेलं आहे. विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, राज्य सरकारने याला साफ नकार दिला आहे. अशातच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी 400 रुपये मागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारमधील महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे आहे. या बद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरव्हायरल झाला आहे.