World Cup 2023: 4 संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर, आता ‘या’ 6 संघांमध्येच लढत!

WhatsApp Group

विश्वचषक 2023 आता हळूहळू उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही संघ सातत्याने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत करत आहेत, तर काही संघ खराब फॉर्ममध्ये झुंजत आहेत आणि त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे खूप कठीण मानले जात आहे. यावेळच्या विश्वचषकात उत्कंठा रंगली आहे, मोठे आणि चॅम्पियन संघ या विश्वचषकात अपसेटचे बळी ठरताना दिसले. यावेळी चॅम्पियन संघाला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण झाले आहे.

4 संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर 

विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीची शर्यत आता खूपच रोमांचक बनली आहे, जवळपास चार संघ या उपांत्य फेरीतून बाहेर पडले आहेत. ज्यामध्ये बांगलादेश, इंग्लंड, पाकिस्तान आणि नेदरलँडचा समावेश आहे. या सर्व संघांनी 6-6 सामने खेळले आहेत. इंग्लंडने 6 सामन्यांत फक्त एकच सामना जिंकला आहे, नेमकी हीच परिस्थिती बांगलादेशची आहे. बांगलादेशला 6 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. याशिवाय पाकिस्तान आणि नेदरलँड्सने 2-2 सामने जिंकले आहेत. येथून या चार संघांनी आपापले सामने जिंकले तरी ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत पोहोचू शकणार नाहीत.

उर्वरित 6 संघ आता उपांत्य फेरीत भिडतील. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ उपांत्य फेरीत जवळपास पोहोचले आहेत. भारतीय संघ या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही आणि 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिका 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता सर्वाधिक स्पर्धा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया टॉप-4 मध्ये आहेत. टॉप-4 मधील चार संघच उपांत्य फेरीत पोहोचू शकतील.