मोफत साडी घेण्यासाठी पोहोचलेल्या महिलांमध्ये चेंगराचेंगरीत 4 ठार तर 11 जखमी

WhatsApp Group

वानियांबडी येथे शनिवारी मोफत साड्या घेण्यासाठी पोहोचलेल्या महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये चार महिलांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थायपुसम सणानिमित्त या महिला साडीचे टोकन घेण्यासाठी आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तामिळनाडूतील तिरुपत्तूरची आहे. वानियांबडी येथे महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. असे सांगितले जात आहे की एक व्यक्ती मोफत साड्या आणि वेष्टी (पांढरे धोतर) चे टोकन वाटप करत होता. दरम्यान, टोकन घेण्यासाठी घाईत असलेल्या महिलांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली. बायका इकडे तिकडे धावत एकमेकांच्या अंगावर जाऊ लागल्या.

घटनास्थळी गोंधळ उडाला
काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी एकच राडा झाला. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे थिरुपथूर पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.