PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं, इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी पहिल्याच दिवशी ठोकली शतके

WhatsApp Group

रावळपिंडी कसोटीत इंग्लंड क्रिकेट संघाने धडाकेबाज फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 75 षटकांत 4 गडी गमावून धावफलकावर 506 धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. इंग्लिश संघाने कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा 112 वर्ष जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्याने 1910 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 6/494 धावा केल्या होत्या.

एवढेच नाही तर इंग्लंड हा पहिला संघ बनला आहे ज्याच्या 4 फलंदाजांनी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले आहे. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही सलामीवीरांसह इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी शतके ठोकली. सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांनी शानदार शतके झळकावली आणि पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली. यानंतर ओली पोपने 108 धावांची शानदार खेळी केली. पहिले कसोटी शतक हॅरी ब्रूकच्या बॅटने 80 चेंडूत झळकावले.

एका षटकात 6 चौकार

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला हॅरी ब्रूक उत्कृष्ट लयीत दिसत होता. ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. त्याने डावातील 68व्या षटकात 6 चौकार मारले. ब्रूकने गोलंदाज सौद शकीलच्या षटकात 6 चौकार मारले. पहिल्या दिवसअखेर ब्रूकने 81 चेंडूत 101 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा