मोठी दुर्घटना! फ्लॅट कोसळून 4 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

नवी दिल्ली – दिल्लीतील बवाना येथे राजीव रतन आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या फ्लॅटची इमारत कोसळल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे building collapse in delhi . पोलिसांकडून शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मृत मृतांमद्धे रुकैया खातून, शहजाद, १२ वर्षांची मुलगी आफरीन आणि दानिश यांचा यात समावेश आहे. तसेच 2 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून फातिमा आणि शहनाज अशी जखमींची नावे आहेत.

उत्तर दिल्लीतील बवाना या भागात राजीव रतन आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेला फ्लॅट कोसळून ही मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 15 फ्लॅट अचानक कोसळल्यामुळे आणखी दोन ते तीन जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत दोन जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेला पोलिस स्टेशनला शुक्रवारी दुपारी दिल्ली जल बोर्डाजवळील एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. यात 4-5 लोक आणि लहान मुले ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जेसीबीच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा 

‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम