Pune; सह्याद्री स्कुलमधील 4 मुलांचा धरणात बुडून मृत्यू

WhatsApp Group

खेड – पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. यात २ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची सहल आली होती.

चार मुलं चासकमान धरणात बुडाल्याची घटना संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोन मुले आणि दोन मुली मृत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाण्यातून सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचा दीदी आणि नव्या भोसले अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मात्र सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात आहे. असे असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.