जाणून घ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल

WhatsApp Group

जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल 2022 Indian Premier League ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. आज आम्ही अशा फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक चौकार मारले आहेत.

शिखर धवन (६५४ चौकार) – टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएलमध्ये चौकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये 191 डाव खेळणाऱ्या धवनने येथे 654 चौकार मारले आहेत. धवन या लीगमध्ये डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. त्याने या लीगमध्ये 44 अर्धशतकांसह 5784 धावा केल्या आहेत.

विराट कोहली (546 चौकार ) – सर्वाधिक चौकार मारणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने या लीगमध्ये 6283 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने या लीगमध्ये आतापर्यंत 546 चौकार मारले आहेत.

डेव्हिड वॉर्नर ( 525 चौकार ) – हैदराबाद संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये आजवर 150 डावांमध्ये 5449 धावा करताना 525 चौकार ठोकले आहे.