विरारमध्ये 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 3 जणांना अटक, एका महिलेचाही समावेश

WhatsApp Group

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मोठी बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

सर्व आरोपी 20 ते 22 वयोगटातील – पोलीस

अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असून सर्व आरोपी 20 ते 22 वयोगटातील असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले. आरोपी महिलेने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले जेथे नंतर तिचे तीन मित्र आले होते. त्यापैकी दोघांनी मुलीवर बलात्कार केला तर तिसऱ्याने तिचा विनयभंग केला.

वराडे यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेने बुधवारी तक्रार दाखल केली, त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर चौथ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.