बाप रे..महिलेच्या डोळ्यातून काढल्या 3 जिवंत माशा

WhatsApp Group

दिल्ली – दिल्लीमधील वसंत कुंज येथील फोर्टीस रुग्णालयामध्ये एका महिलेच्या डोळ्यातून चक्क 3 जिवंत माशा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या महिलेला गेल्या 4 ते 6 आठवड्यांपासून डोळ्यामध्ये सूज आणि खाज येत होती. मात्र, होणारा त्रास वाढत गेल्याने महिलेने रुग्णालयात डॉक्टरांना दाखवला. त्यावेळी, महिलेच्या डोळ्यात बोटफ्लाई असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन करुन त्या माशा बाहेर काढण्याचे ठरले.

महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन डोळ्यामधील बोटफ्लाई म्हणजेच माशा बाहेर काढण्यात आल्या आहेत. या माशांच साईज 2 cm एवढी होती. 32 वर्षीय ही महिला दोन महिन्यांपूर्वी अमेजनच्या जंगलामध्ये फिरण्यासाठी गेली होती. या पर्यटनावरुन परतल्यानंतर तिच्या डोळ्यात हा त्रास सुरू झाला होता. उजव्या डोळ्याला सूज आली होती, महिलेच्या डोळ्याला अधिक त्रास जाणवू लागल्यामुळे तिने डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, तेथील डॉक्टरांना बोटफ्लाई काढण्यात आली नाही.

महिलेने दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयामध्ये धाव घेतली. त्यावेळी, 10 ते 15 मिनिटांच्या शस्त्रक्रियेतून त्यांच्या डोळ्यातील 3 माशा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे या महिलेला बेशुद्ध होण्याचे कुठलेही इंजेक्शन या शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात आले नाही. याउलट, शस्त्रक्रियेनंतर काही तासांमध्येचं महिलेचा रुग्णालयात डिस्चार्जही देण्यात आला.