मुंबई – मालेगाव महानगरपालिकेत कॉंग्रेसच्या तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मालेगावमधील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
या सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Malegaon, Maharashtra: 27 corporators of the Congress party joined Nationalist Congress Party (NCP) today in the presence of party leader and Deputy CM Ajit Pawar. Malegaon Mayor Tahira Shaikh joined the party too. pic.twitter.com/XYVLLslEnw
— ANI (@ANI) January 27, 2022
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षांनातर केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.