24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू

WhatsApp Group

नवी दिल्ली –  गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे एकूण 2 लाख 68 हजार 833 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, आतापर्यंत देशात कोविड बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 68 लाख 50 हजार 962 झाली आहे ( New corona cases in India ). कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस  वाढतच जात असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे एकूण 402 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 4 लाख 85 हजार 752 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात गेल्या 22 तासांत ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही 5.01 टक्के वाढ झाली आहे. तर काल देशात ओमिक्रॉनची 6,041 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14,17,820 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 1 लाख 22 हजार 684 रुग्ण बरे झाले आहेत, जे नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 3 कोटी, 49 लाख, 47 हजार, 390 लोकांनी या कोरोनावर मात केली आहे.

देशातील दैनिक पॉझिटिव्हिटी रेट आता 16.66 टक्के झाला आहे, जो पूर्वी 14.7 टक्के होता. वीकली पॉझिटिव्हिटी रेट देखील आता 12.84 टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात लोकांना आतापर्यंत एकूण 156.02 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.