IIT बॉम्बेच्या २६ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या!

WhatsApp Group

मुंबई – देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थ्याने काल रात्री मुंबईत आत्महत्या केली ( Student commits suicide ). मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. या विद्यार्थ्याचे नाव दर्शन असं आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर विद्यार्थ्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हा तरुण नैराश्यात असल्याने त्याने आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केल्याचे सांगितले. मात्र, या सुसाईड नोटमध्ये आपण बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्याने म्हटले आहे. विद्यार्थ्याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.