गडचिरोली – महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 26 नक्षलवादी ठार केले असून चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी ही माहिती आहे.
26 Naxals have been eliminated in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles of Gyarapatti in Gadchiroli district today. Three jawans have suffered injuries in the encounter: Gadchiroli SP Ankit Goel
— ANI (@ANI) November 13, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळच्या दरम्यान पोलिसांचे सी-60 चे पथक शोध मोहीम राबवीत होते. यावेळी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.