महाराष्ट्र हादरला! सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू, मृत्यू झालेल्यांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश

WhatsApp Group

नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 नवजात मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक एस.आर. वाकोडे यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेक रुग्ण हे गंभीर स्थितीत आणले गेले होते. मात्र, उर्वरित रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नामांकित कंपनीकडून औषधे खरेदी करायची होती, मात्र काही कारणांमुळे औषधे खरेदी करता आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने राज्य सरकारवर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) प्रवक्ते विकास लवांडे यांनी ट्विटरवर सांगितले की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू राज्य सरकारकडून पुरवठ्याअभावी झाला आहे. सण उत्सव आणि इव्हेंट बाजी जाहिरात बाजी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.