
Ganeshotsav 2022: कोरोना महासाथीचे सावट दूर झाल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. मुंबई व परिसरातील अनेक कोकणवासिय गणेशोत्सवात गावी जाणार आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी केली आहे. एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस (MSRTC Extra Buses) सोडण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिरीक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी (Reservation) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत. तसेच गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान कोकणातून (Konkan) मुंबईसाठीच्या अधिक बसेस असणार आहेत.
कोकणातील (Konkan) प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे. त्याशिवाय, अतिवृष्टीमुळे कोकणातील खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई (Mumbai)-गोवा (Goa) महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान 10 अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.