उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर अचानक ढग फुटल्याने तीस्ता नदीला पूर आला. लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत खोऱ्यातील काही लष्करी आस्थापनांना फटका बसला आहे.
ढग फुटल्यानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग सिंगताम येथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
#WATCH | Sikkim: A flood-like situation arose in Singtam after a cloud burst.
(Video source: Central Water Commission) pic.twitter.com/00xJ0QX3ye
— ANI (@ANI) October 4, 2023
लष्कराची वाहनेही बुडाली
गुवाहाटीतील संरक्षण पीआरओ म्हणाले, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. 23 जवान बेपत्ता आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली. लष्कराचे 23 जवान बेपत्ता तर 41 वाहने चिखलात बुडाल्याचे वृत्त आहे.
भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया म्हणाले, “सरकारी यंत्रणा कामाला लावून लोकांचे प्राण वाचवले जात आहेत, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. यात कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, परंतु सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.