सिंधुदुर्ग, गेल्या 24 तासांत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक २२.१ मि.मी. पावसाची नोंद

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२.०मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड २ (१४.६), मालवण ११.२(१९.१), सावंतवाडी – २२.१(५३.०), वेंगुर्ला १३.३ (२३.४), कुडाळ ११.९(२२.९), कणकली ३.३ (३५.३), कुडाळ ११.९(२२.९), वैभववाडी०.८(८१.५), दोडामार्ग ७.४(३९.४), असा पाऊस झाला आहे. दरम्यान दुपारनंतर दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे व्यवसायिक, व्यापारी वर्गाची धावपळ उडाली तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत.