धक्कादायक! इन्सुली येथे २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

WhatsApp Group

बांदा – इन्सुली सावंतटेंब येथील प्रतीक उमेश राणे (वय-२१) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. प्रतीक रात्री जेवण्यासाठी घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. शोधाशोध सुरू केल्यानंतर प्रतीक जवळच्या पडवीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

गळफास घेऊन प्रतीकने आपले आयुष्य संपवले. प्रतीक हा मालवण येथे पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. प्रतीकने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलं नाही. बांदा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.