2025 मध्ये रिलीज झाले 110 मराठी चित्रपट, सगळ्या सिनेमांची मिळून कमाई फक्त…

WhatsApp Group

मुंबई : आशयघन, दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे वर्ष गल्ल्याचा विचार करता कोरडेठाकच ठरले. ११० मराठी चित्रपट यंदा प्रदर्शित झाले. त्यांची एकूण मिळून कमाई राहिली अवघी ९९ कोटी ४६ लाख रुपये एवढीच.

त्यातही अवघ्या दहा चित्रपटांनी, म्हणजे ९ टक्के चित्रपट, जवळपास ७५ टक्के म्हणजे ७४.४६ कोटी रुपये कमाईचा वाटा उचलला. इतर सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या तुलनेत हे सर्वात कमी बॉक्स ऑफिस कलेक्शन ठरले आहे.

आज दाक्षिणात्य सिनेमाच्या एका चित्रपटाची कमाई जितकी असते, तितकी रक्कम मराठी सिनेसृष्टीला संपूर्ण वर्षभरात मिळते, ही वस्तुस्थिती धक्कादायक आहे.

यामागची कारणे अनेक आहेत. महाराष्ट्रातच मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर हिंदी सिनेमांकडे वळलेला आहे. मराठी सिनेमांचं प्रमोशन मर्यादित, बजेट कमी आणि थिएटरमध्ये शो मिळण्याची लढाई कठीण होत चालली आहे.

व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक खेचणाऱ्या भव्य सिनेमांची संख्या मराठीत कमीच आहे’, असे मराठी सिनेसृष्टीत कार्यरत असलेले सांगतात.