भारताला पाकमध्ये जाऊन खेळावे लागणार! तर अमेरिकेत खेळला जाणार T20 विश्वचषक, ICCची घोषणा!

WhatsApp Group

नवी दिल्ली – ICC ने 2024 ते 2031 दरम्यान T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताने 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवल्यानंतर, भारत पुढील आठ वर्षांत तीन मोठ्या आयसीसी स्पर्धांचे आयोजन करेल.

2024 ते 2031 दरम्यान भारतात तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. भारत 2026 मध्ये श्रीलंकेसोबत टी-20 विश्वचषक आयोजित करणार आहे. तर 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश 2031 मध्ये विश्वचषक स्पर्धा एकत्रीत आयोजित करतणार आहेत.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हे एकट्या पाकिस्तानकडे आहे त्यामुळे भारताला पाकिस्तानमध्ये जाऊन खेळावेच लागणार आहे. त्यामुळे यावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आयसीसी 2024 ते 2031 या कालावधीत दरवर्षी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करेल. या अंतर्गत अमेरिकेत प्रथमच आयसीसीची मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या यजमानपद हे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे असणार आहे.

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार अशा असतील सर्व स्पर्धा

  • 2024 T20 विश्वचषक – वेस्ट इंडिज आणि अमेरिका
  • 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान
  • 2026 T20 विश्वचषक – भारत आणि श्रीलंका
  • 2027 विश्वचषक – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया
  • 2028 T20 विश्वचषक – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
  • 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत
  • 2030 T20 विश्वचषक – इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
  • 2031 विश्वचषक – भारत आणि बांगलादेश