Motivational Quotes | प्रेरणादायी नवीन मराठी सुविचार

WhatsApp Group

एखाद्या गोष्टीच मार्ग मिळाला नाही ना का रडत नाही बसायचं त्याला पर्याय शोधायचे की हे नाही झालं तर अस करू ,ते नाही झालं तर तस करू तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल ,जेव्हा तुम्ही positive करायला लागला तेव्हा तुमचं बघून तुमचे मित्र- मैत्रिणी ,family positive विचार करायला लागतात आणि चांगला बदल असाच घडतो हे नेहमी लक्षात ठेवा ,हेच तर आयुष्य आहे आणि असच ते जगायचं असतं. 

  • विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
  • आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
  • प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.
  • ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.
  • मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.
  • एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
  • दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
  • कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.
  • नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
  • ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.

Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा  सामना करू शकतो.

  • रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन
  • भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.
  • आपण फक्त आनंदात रहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
  • काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
  • मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.
  • थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
  • प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.
  • मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
  • स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.
  • परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी.

चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. 

  • सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
  • श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
  • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
  • एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
  • प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
  • आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
  • आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
  • स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
  • धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.
  • आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.

आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असो.

  • बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक.
  • त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
  • आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
  • मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
  • प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.
  • कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे “खरे भाषण” !
  • खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे.
  • जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.
  • खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते.
  • कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.