8 कोटी रुपयांच्या 2000 च्या बनावट नोटा जप्त, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

WhatsApp Group

महाराष्ट्र पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा बाजारात आणण्याची तयारी सुरू होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांना मोठे यश मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे 52 वर्षीय राम शर्मा आणि 55 वर्षीय राजेंद्र राऊत अशी आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पालघरचे रहिवासी असून ते बनावट नोटा बाजारात पोहोचवण्याचे काम करत होते.

बनावट नोटा छापणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी 2000 च्या नोटांचे 400 बंडल जप्त केले आहेत. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. बनावट नोटा छापणाऱ्यांचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांना बाजारात 2000 रुपयांच्या नोटांच्या तुटवड्याचा फायदा घ्यायचा होता.