Agnipath Recruitment : तरुणींसाठी खुशखबर… अग्निपथ योजनेत 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव

WhatsApp Group

Agnipath Recruitment : भारतील सैन्य दलात (Indian Army) भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी देण्यात आली आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे. लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरूवातही झाली आहे. या योजनेमध्ये 2022 च्या पहिल्या बॅचमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.