
दोन विमानांची एकमेकांना धडक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला. ही दुर्घटना लॅण्डिंगपूर्वी घडली आहे. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली. या दुर्घटनेमध्ये विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना जीव गमवावा लागला.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे गुरुवारी विमानतळावर विमान लॅण्ड करताना ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर झाला.
🇺🇸| Múltiples muertes después de que dos aviones chocaran en el norte de California mientras intentaban aterrizar en un aeropuerto local. pic.twitter.com/w1Gf6JjRAW
— Alerta News 🚨 (@Alerta_News_) August 19, 2022
एका विमानात दोन लोक होते. तर दुसऱ्या विमानात फक्त वैमानिक होता. या अपघाताचं नेमकं कारण अजून समोर आलं नाही. या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला आहे.