Coronavirus: चिंता वाढली! पुण्यात ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळले!

WhatsApp Group

Coronavirus: राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये (Corona Patient) पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. अशामध्ये राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron) BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरियंट्सच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आता पुण्यामध्ये ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरिएंटचे (Omicron BA.5 Sub Variant) दोन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, हे दोघे जण दुबईहून पुण्याला परतले. या वेळी पुणे विमानतळावर त्यांनी नियमीत तपासणी केली. या वेळी दोघेही पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. महत्त्वाचे म्हणजे दोघेही बाधित असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती.

ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सची लागण झालेल्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या खालील प्रमाणे.

  • पुणे- 93
  • मुंबई-51
  • ठाणे- 5
  • नागपूर-4
  • पालघर- 4
  • रायगड-3