धक्कादायक, भारतातील या राज्यात सापडले 2 कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतात कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटची 2 प्रकरणे समोर आली आहेत. कर्नाटक राज्यात या प्रकाराचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे ( Omicron Variant detected in Karnataka ). या 2 रुग्णांमुळे पूर्ण देशात खळबळ उडाली आहेत. कारण भारत देशात ओमिक्रॉन व्हेरियंटची हे पहिलेच रुग्ण आहेत.

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारतात कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यातील असून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेल्या रुग्णांचं वय हे अनुक्रमे 66 आणि 46 वर्षे आहेत. या दोन्ही रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटची किरकोळ लक्षणे आढळली असल्याची माहिती समोर आली आहे.

NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले की, आम्ही यापूर्वी कोरोना महामारीमध्ये जी साधने आपण वापरली आहेत, तीच साधने आम्हाला आता वापरावी लागणार आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंट हे एक नवीन आव्हान आता आपल्यासमोर आहे. आम्ही या नव्या घातक व्हेरियंट शोधण्यात यशस्वी झालो म्हणजेच आमची यंत्रणा कार्यरत आहे, हे स्पष्ट होते. सध्या  मास्क ही सार्वत्रिक लसीसारखी आहे, त्यामुळे निष्काळजीपणे न वागता घराबाहेर पडताना मास्कचा वापर करायलाच हवा. तसेच लसीचे दोन्ही डोस घेण्यामध्ये उशीर करू नका. यासोबतच हवेशीर वातावरणात राहा. घाबरण्याची गरज नसून जबाबदारी दाखवताना सतर्क राहावे लागेल. या नव्या ओमिक्रॉन आव्हानालाही आपल्याला सामोरे जावे लागेल, असे व्हीके पॉल म्हणाले.