IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला T20 सामना आज, टीम इंडिया मारणार बाजी?

WhatsApp Group

IND vs AUS 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2022 च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विश्वचषकापूर्वी, भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 6 टी-20 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 179 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 114 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 57 सामने हरले आहेत. याशिवाय तीन सामने टाय झाले तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही.

ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले तर कांगारूंनी आतापर्यंत 158 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामने जिंकले तर 70 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 6 सामन्यांचा निकाल नाही.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. येथे 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये 7 वेळा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडणे चांगले असू शकते.

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ – आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.

भारत- ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक

सामना तारीख  ठिकाण
पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर 2022 मोहाली
दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर 2022 नागपूर
तिसरा टी-20 सामना 25 सप्टेंबर 2022 हैदराबाद