पालघर – पालघर जिल्ह्यातीमधील जव्हार या तालुक्यामध्ये एका १९ वर्षीय आदिवासी तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जव्हार तालुक्यामधील एका गावामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली आहे. या तरूणीवर दोघांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघा आरोपींनी आदिवासी तरूणीवर बलात्कार केला आहे. आरोपींनी तरूणीला शेतातील गोदामामध्ये नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि बलात्कारानंतर आरोपींनी पीडित तरूणीला धमकी दिली. याबाबत कोणाकडे वाच्यता केली तर, जीवे मारू, अशी धमकी त्या दोन आरोपींनी तिला दिली.
पीडितेने घडलेल्या घटनेची सर्व माहिती आपल्या कुटुंबीयातील सदस्यांना दिली. कुटुंबीयातील सदस्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.