19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कारण…

0
WhatsApp Group

मुंबई : मुंबईत बुधवारी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  विधी कुमार सिंग असे या तरुणीचे नाव आहे. मुंबईतील अंधेरी येथील मिलियनेअर हेरिटेज बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावरून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती डीएन नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. घटनेची माहिती मिळताच डीएन नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास करण्यात येत आहे. डीएन नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणीने एक नोट देखील लिहिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणी कशावरून तरी नाराज होती. या कारणास्तव तिने हे पाऊल उचलले.

ही तरुणी मुंबईतील विलेपार्ले भागातील मिठीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. इमारतीच्या चौकीदाराने जमिनीवर रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सोसायटीच्या सदस्यांना माहिती दिली, त्यांनी पोलिसांना बोलावले. तरुणीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.