Maharashtra Police Bharti 2022: पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी 18000 हून अधिक पदांवर भरती, अर्जासाठी उरले अवघे तीन दिवस

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलिसांनी काही काळापूर्वी पोलीस कॉन्स्टेबलची बंपर भरती केली आहे. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीखही जवळ आली आहे. तुम्ही अद्याप यासाठी अर्ज केला नसेल, तर महाराष्ट्र पोलिसांच्या mahapolice.gov.in या वेबसाइटवर जाऊन 30 नोव्हेंबरपूर्वी फॉर्म सबमिट करा. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीची अर्ज प्रक्रिया संपण्यास फक्त तीन दिवस उरले आहेत.
महाराष्ट्र पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, कॉन्स्टेबलच्या 18331 रिक्त पदांवर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात ड्रायव्हर आणि एसआरपीएफ पोलीस कॉन्स्टेबलच्या काही जागाही आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022: रिक्त जागा तपशील
पोलीस कॉन्स्टेबल – 14956
SRPF पोलीस कॉन्स्टेबल – 1204
ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल – 2174
शैक्षणिक पात्रता
पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार 12वी पास असावा. ड्रायव्हर पदासाठी, उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे दरम्यान असावे.