क्रीडा विश्वातून रविवारी एक दु:खद बातमी समोर आली. टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
दीनदयालन विश्वा तमीजगा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष टीमचा खेळाडू होता. शिलाँग इथे ८३ व्या सीनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी दीनदयालन विश्वाची निवड झाली होती.
Heartbreaking to learn that Tamil Nadu paddler, Deenadayalan Vishwa passed away in an accident in Ri Bhoi District. He was on his way to Shillong to participate in the 83rd Senior National Table Tennis Championship. Sincere condolences to his family & friends. pic.twitter.com/XpeJMG4ad3
— Anurag Thakur (@ianuragthakur) April 18, 2022
तो तमिळनाडूहून मेघालयामध्ये शिलाँगला जाण्यासाठी निघाला होता. विमानतळावर सुखरुप उतरला पण शिलाँगला स्पर्धेसाठी पोहोचण्याआधीच काळाने घात केला. ट्रकने विश्वाच्या कारला जोरदार धडक दिली.
Extremely distressed to know about the tragic and untimely demise of a rising national table tennis player Vishwa Deenadayalan from Tamil Nadu, in an accident in Meghalaya. My thoughts are with the bereaved family, friends, and admirers.
May his soul attain Sadgati.
।।ॐ शांति।। pic.twitter.com/AcKZCzwlQa
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 18, 2022
मिळालेल्या माहितीनुसार वेगाने येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटलं आणि धडक देऊन तो ५० मीटर दरीत कोसळला. या दुर्घटनेमध्ये विश्वा गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कुटुंबीय आणि मित्रांवर शोककळा पसरली. नव्या युवा खेळाडूला गमवल्याची भावना क्रीडा विश्वात आहे.