John Cena Retirement : 16 वेळचा वर्ल्ड चॅम्पियन जॉन सीनाची WWE मधून निवृत्तीची घोषणा

WhatsApp Group

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या बातमीने चाहते दु:खी झाले होते पण आता आणखी एका दिग्गजाने क्रीडा जगतातून निवृत्ती जाहीर केली आहे. कुस्तीपटू जॉन सीनानेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. जॉन सीनाला भारतातही खूप पसंत केले जाते. WWE मध्ये जॉन सीनाने 16 वेळा चॅम्पियनशिप जिंकली आहे.

जॉन सीनाने निवृत्तीचा निर्णय घेतला
जॉन सीनाने टोरंटोमधील मनी इन द बँक प्रीमियम लाइव्ह इव्हेंटमध्ये निवृत्तीशी संबंधित अपडेट देऊन लोकांना आश्चर्यचकित केले. सीनाने त्या कार्यक्रमात सांगितले की तो रेसलमेनिया 2025 मध्ये शेवटचा सामना खेळणार आहे आणि त्यानंतर तो निवृत्त होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena)

जॉन सीनाची WWE मध्ये एंट्री 2002 साली झाली होती आणि त्याची आतापर्यंतची कारकीर्द खूपच नेत्रदीपक राहिली आहे. 47 वर्षीय जॉन सीनाने सर्वाधिक वेळा WWE चॅम्पियनशिप जिंकली आहे. जॉनने 16 वेळा चॅम्पियनशिप जिंकली अआहे. कुस्तीशिवाय जॉनने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत.