
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 156 ग्रॅम सोन्याचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या टीमने 3 महिने मेहनत घेतली. या पुतळ्याची किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे. राधिका चेन्सचे मालक बसंत बोहरा यांनी सांगितले की, 18-कॅरेट सोन्याने बनवलेल्या पुतळ्याचे वजन 156 ग्रॅम आहे कारण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेत भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या होत्या. मोदींचा हा पुतळा विकत घेण्यासाठी अनेक जण स्वारस्य दाखवत आहेत, मात्र ज्वेलर्सने अद्याप तो विकण्याचा निर्णय घेतलेला नाही.
बोहरा म्हणाले, “मी नरेंद्र मोदींचा चाहता आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून मला काहीतरी करायचे होते. आमच्या कारखान्यात ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे 20-25 कारागिरांना सुमारे तीन महिने लागले. सध्या पुतळा विक्रीसाठी नसल्याने त्याची कोणतीही निश्चित किंमत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोन्याचा पुतळा दिसत आहे. पीएम मोदींचा सोन्याचा पुतळा पाहून लोक सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.
An artist made a 156-gram gold idol of PM Modi. The statue was included in the Bombay Gold Exhibition.@narendramodi @PMOIndia @narendramodi_in pic.twitter.com/Xi2JlU3Ka0
— Payal Mohindra (@payal_mohindra) January 14, 2023
पीएम मोदींचा पुतळा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इंदूर आणि अहमदाबादमधील काही व्यावसायिकांनी पीएम मोदींचा पुतळे बनवले आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पीएम मोदींचे चित्र असलेली सोन्याची नाणीही मोठ्या प्रमाणात विकली गेली. अलीकडेच, मेरठ, यूपी येथे आयोजित केलेल्या दागिन्यांच्या प्रदर्शनात अनेक राज्यांतील सराफा व्यापाऱ्यांनी आपले दागिने प्रदर्शित केले. या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींचे चित्र असलेली नाणी आकर्षणाचे केंद्र ठरली होती.