भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी

0
WhatsApp Group

आसाममधील गोलाघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोलाघाट येथील बलिजन भागातील डेरागावजवळ हा अपघात झाला. जिथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. गोलाघाट एसपींनी सांगितले की, अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत.

अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे तुकडे झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अपघातानंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.

या घटनेची माहिती देताना गोलाघाटचे एसपी म्हणाले की, बसमध्ये प्रवास करणारे सर्व लोक तिनसुकिया येथील किलिंगा मंदिरात जात होते. सर्व जखमींना जोरहाटच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. 14 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या क्रेनच्या साहाय्याने दोन्ही खराब झालेले वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस व्यस्त आहेत. मात्र, बसमध्ये किती जण प्रवास करत होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.