लालबागमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 42 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळाचौकी पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली आहे यामध्ये त्यांनी हे पाऊल का उचलंलं हे सांगितलंम आहे.
गेल्या महिन्यातही लालबाग येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. येथे मुलीनेच आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तीन महिने घरात ठेवले होते. ही घटना ताजी असतानाच आता या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.