
चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. जे आकडे समोर येत आहेत ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या अहवालावरून चीनमध्ये कोरोना किती पसरला आहे याची कल्पना येऊ शकते. चीनमध्ये दर आठवड्याला हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अहवालात असे समोर आले आहे की चीनमध्ये आतापर्यंत 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली असून गेल्या 1 आठवड्यात येथे 13 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
अहवालानुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 13 ते 19 जानेवारी दरम्यान सुमारे 13 हजार लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला. चीनच्या एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या कोरोनाचे आकडे पाहून आता जगभरात तणाव वाढला आहे. नववर्ष साजरे करत असताना हा दावा करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुट्टीत लोक खूप प्रवास करतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा अधिक प्रसार होण्याची भीती आहे.
मृतांची संख्या वाढू शकते
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चीनने कठोर शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले होते. सरकारच्या या धोरणाला खूप विरोध झाला, अशा परिस्थितीत जिनपिंग सरकारने शून्य कोविड धोरण संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली.