कोळशाच्या अवैध उत्खननादरम्यान भीषण अपघात 13 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

झारखंड – धनबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी कोळसा खाणीतील अवैध उत्खननामुळे १३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोळशाखाली अनेक जण गाडले गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलीस या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

झारखंडच्या धनबादमध्ये अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कोळसा उत्खनन व्यवसाय सुरू असून निरसा परिसर अवैध हे अवैध कोळसा उत्खननाचे केंद्र बनले आहे. या परिसरातून कोळसा उत्खनन करून तो बेकायदेशीरीत्या इतर राज्यांमध्ये पाठवला जातो.