HSC Result 2022: आज जाहीर होणार बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता असा करा चेक

0
WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) इयत्ता 12वीचा निकाल आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाहीर करेल. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत साइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. बोर्डाने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती. महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत सुमारे 14 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,60,780 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी नोंदणी केली होती. त्याचवेळी कला शाखेसाठी 4,04,761 व वाणिज्य शाखेसाठी 3,45,532 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

निकाल जाहीर झाल्यानंतर, अधिकृत साइटवर निकाल पाहण्यास सक्षम नसल्यास, विद्यार्थी त्यांच्या फोनवर निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी MHHSC<space>ROLL NO टाइप करून 57766 वर पाठवावे. काही वेळाने तुमच्या फोनवर निकाल येईल.

याप्रमाणे तपासा निकाल

  • विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर होम पेजवर एचएससी परीक्षेच्या निकालावर क्लिक करा
  • यानंतर विद्यार्थ्यांनी रोल नंबर टाका
  • त्यानंतर विद्यार्थ्याचा निकाल स्क्रीनवर दिसेल 
  • आता विद्यार्थी निकाल तपासा आणि डाउनलोड करा
  • शेवटी विद्यार्थी निकालाची प्रिंट काढू शकतात.