बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

WhatsApp Group

सोलापूर – बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बार्शीमधील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सृष्टी बोंदर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोरा गावची रहिवासी आहे. सृष्टी बारावीच शिक्षण घेण्यासाठी बार्शीतील (Barshi) ब्रम्हचैतन्य नगरमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होती.

मात्र, बारावीमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे सृष्टीने भाड्याच्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ८५ ते ९० % ची अपेक्षा असणाऱ्या सृष्टीला ६५% मिळाल्याच्या नैराश्यतून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वातर हळहळ व्यक्त केली जातं आहे. दरम्यान, सृष्टीच्या आत्महत्येबाबतचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.