नाशिकमध्ये वीज पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
WhatsApp Group

नाशिक: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागलाण तालुक्यामध्ये वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला. वादळी वारा व पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

बागलाण तालुक्यामधील देवळाणे येथे पवन सोनवणे (12 वर्ष) मुलगा अंगावर वीज पडून मयत झाला.