‘या’ मुलाला एका वर्षात कोरोनाच्या तीन्ही व्हेरियंटची लागण, जाणून घ्या कशी आहे प्रकृती

WhatsApp Group

जेरुसलेम – 11 वर्षाच्या इस्रायली मुलाला 1 वर्षात तीन वेगवेगळ्या कोरोना व्हेरियंटची लागण झाली आहे. एलोन हेल्फगॉट असं या मुलाचं नाव असून त्याला अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे  israeli boy infected all 3 covid variants.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य इस्रायली शहरातील केफर सबाह येथील हेल्फगॉट नावाचा मुलगा गेल्या आठवड्यात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ओमिक्रॉन संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुलगा आयसोलेशनमध्ये आहे. हेल्फगॉटने सांगितले की त्याला यापूर्वी कोरोनाच्या दोन्ही व्हेरियंटची लागण झाली होती.

इस्रायली वृत्तवाहिनी 12 न्यूजशी बोलताना हेल्फगॉटने सांगितले की, तो आता ठीक आहे आणि पूर्णपणे निरोगी आहे. त्याने सांगितले की, तो यापूर्वी दोनदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

त्यांने सांगितले की, यापूर्वी जेव्हा आपल्याला कोरोनाच्या अल्फा व्हेरियंटची लागण झाली होती, त्यावेळी खूप ताप आला होता. मात्र ओमिक्रॉनबाबत बोलताना तो म्हणाला की अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंट फार कमकुवत आहेत.